मलकापूर :- संपूर्ण देशात विशेषत: महाराष्ट्र मध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवा निमित्त मलकापूर शहरातील प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून मंगल पूजन करण्यात येत आहे. मलकापूर येथील सुयोग शर्मा दरवर्षी मोठ्या उत्साहात घरी गणपती प्रतिष्ठापना करतात आणि दरवर्षी काही ना काही देखाव्या बनवून सामाजिक संदेश देण्याचे प्रयत्न करतात.यंदाच्या गणेशोत्सव थीम ऑपरेशन सिंदूर वर साकारली आहे.9 मे 2025 रोजी पहलगाम, जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने अतिरेक्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले, हिंदू समारंभा मध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या आणि विवाहित हिंदू महिलांनी सुहाशीनीचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाल सिंदूरचे नाव दिले आहे.लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांकडून सीमेपलीकडील त्या ठिकाणांवर भारतीय लष्कराने हवाई हल्ले करून 100 हून अधिक दहशतवादी ठार मारले गेले. धर्म विचारून महिलांचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवादी यांचे ठिकाणे नष्ट करून भारतीय लष्कराने आपली शक्ती आणि शौर्य दाखवून या हल्यात मारल्या गेलेल्या लोकाचे प्रतिशोध त्यांच्या पत्नी यांना मिळवून दिले.
शर्मा कुटुंबाने भारतीय लष्कराच्या "शौर्य ऑपरेशन सिंदूरचा" देखावा गणेश उत्सव निमित्त साकारला...
Hanuman Sena News
0
Post a Comment