मलकापूर 7 सप्टेंबर 2025 आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका आयकॉन अवॉर्ड विजेत्या कु.स्मिता मुरलीधर कोलते यांना लेवा युथ फोरम आणि लेवा शुभमंगल यांच्यावतीने आयोजित लेवा गौरव सोहळा कार्यक्रम संयुक्त 2025 मध्ये विशेष प्राविण्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा मलकापूर येथील भातृमंडळ प्रा.अनिल खर्चे सर व्ही.भी कोलते कॉलेज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी,पदवीधर आणि विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.ज्यामुळे समाज सुधारण्याच्या कार्याला गती मिळाली. कु स्मिता कोलते NEP. मॅडम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा नवोपक्रम सादर केला. जो बुलढाणा जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर निवडला गेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतुल्य ठरला असून त्यांच्या सतरा वर्षांच्या अविरत कार्याचा भाग आहे. त्यांना गौरवशाली शिक्षक सन्मानपत्र व नॅशनल आयकॉन अवॉर्ड देखील प्राप्त झाले आहे. कु स्मिता कोलते यांनी समाज सेवेतही मोलाचे योगदान दिले आहे. 2015 मध्ये स्त्री सशक्तिकरण काळाची गरज हा जनजागृती पर कार्यक्रम राबवला त्यानंतर 2016 मध्ये बालमजुरी मुक्ती, 2017 मध्ये शेतकरी जगवा देश वाचवा, 2019 मध्ये व्यसनमुक्ती भारत, 2021 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव, 2022 मध्ये सर्वधर्मसमभाव, सन 2023 मध्ये स्त्री पुरुष समानता, सन 2024 मध्ये साक्षर भारत उज्वल भारत मतदान जागृती, सन 2025 मध्ये देशाची शान स्त्रीचा सन्मान असे विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. एक पेड मा के नाम अभियानांतर्गत विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेतले असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देतात तसेच पुस्तक दान वृद्धाश्रमात अन्नदान अपंग आणि मूकबधिर मुलांच्या सेवेचे कार्य करतात या सत्कार सोहळ्यातील या पुरस्काराने स्मिता कोलते यांच्या कार्याला नव्याने,बांधवांनी त्यांचे कौतुक करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गौरव गुणांचा उत्सव यशाचा या घोषणेसह हा सोहळा यशस्वी झाला.
लेवा युथ फोरम आणि लेवा शुभमंगल यांच्या वतीने आयोजित लेवा गौरव सोहळा कार्यक्रमातून आदर्श शिक्षिका स्मिता कोलते विशेष प्राविण्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق