नांदुरा : शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या 'विघ्नहर्ता' महिला गणेशोत्सव मंडळ नांदुरा खुर्द च्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मंडळाचे हे चौथे वर्ष असून, नुकतीच या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील शे-दोनशे महिला व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.बैठकीत सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी सरिताताई बावस्कार यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली.कार्यकारणी :-अध्यक्ष : सरिताताई बावस्कार उपाध्यक्ष : रेखाताई रंभाडे कार्याध्यक्ष : विजया बावणे,पुजारी: उमा राखोंडे, अंजली क्षीरसागर कोषाध्यक्ष: शांताबाई सातव,नेहा मंडवाले सह कोषाध्यक्ष: कुंदाताई नारखेडे,ज्योती कारंगळे सचिव: कमलबाई नारखेडे युवती कार्यकारणी: राणी सावळे,समिक्षा बडवे,दुर्गा मुऱ्हेकर, संजीवनी ठोंबरे,सोशल मीडिया प्रमुख: चंचल हेडाऊ, भाग्यश्री क्षीरसागर, पूर्वा क्षीरसागर संघटक: लीलाबाई डिवरे, गायत्री दिवनाले, अनिता इंगळे, वैष्णवी वानखडे, गौरी मंडवाले, कांचन बावस्कार मार्गदर्शक: अनुराधाताई नवले, संगीताताई नारखेडे, प्रियाताई कोठारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी कटिबद्धता दर्शविली आहे.यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यावर चर्चा झाली. यात महिला व युवतींसाठी खास स्पर्धा घेऊन त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. तसेच, गणेशमूर्तीचा आगमन सोहळा व विसर्जन सोहळा पारंपरिक व शिस्तबद्ध पद्धतीने कसा साजरा करता येईल, यावरही सखोल विचारमंथन करण्यात आले.यंदाचा गणेशोत्सव 'विघ्नहर्ता' मंडळातर्फे अधिक भव्य आणि समाजोपयोगी उपक्रमांनी भरलेला असेल,असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षा "सरिताताई बावस्कार"यांनी व्यक्त केला. मंडळाच्या या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
'विघ्नहर्ता' महिला मंडळ गणेशोत्सवासाठी सज्ज,अध्यक्षपदी सरिताताई बावस्कार यांची निवड...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق