Hanuman Sena News

नागपूर पुणे गरीब रथ रेल्वेचा मलकापूरला थांबा मंजूर...


मलकापूर:- नागपूर पुणे गरीब रथ या गाडीचा थांबा केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे तसेच मलकापूरचे आमदार चेनसुखजी संचेती यांच्या प्रयत्नाने मलकापूरला थांबा मंजूर झाला आहे गाडी नंबर 12 113  -12 114 नागपूर पुणे गरीब रथ गाडीचा थांबा करीत जिल्हा प्रवासीसेवा संघ गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशील होता सदर थाबा मेळावा याकरिता केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनीची वैष्णव यांना भेटल्या होत्या सदर गाडी हप्त्यातून तीन दिवस धावते व तीन दिवस धावणारी नागपूर पुणे मलकापूरला थांबते यामुळे आठवड्यातून सहा दिवस आता मलकापूर हून पुणे येथे जाता येणार आहे याबद्दल जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष झेड आर यु सी सी मेंबर एडवोकेट महेंद्र कुमार बुरड तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक यांनी माननीय नामदार रक्षाताई खडसे आमदार चैनसुखजी संचेती व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे.

Post a Comment

أحدث أقدم