मलकापूर:- आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर येथे आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब मा. श्री. विजय चव्हाण सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून लि. भो. चांडक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मा. श्री संजयसिंह तोमर सर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी सुंदर भाषणे सादर केली. प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम असा महत्त्वाचा संदेश याप्रसंगी आपल्या भाषणातून दिला कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सौ. चिमणपूरे मॅडम तसेच आभार प्रदर्शन श्री. पढार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق