Hanuman Sena News

चांडक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा, प्राचार्य डॉ. राजूरकर यांचे घोषवादन विशेष आकर्षण...




मलकापुर:- दि. 23 जून 2025 नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकाकापूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रवेशद्वारावर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी स्वतः घोष वादन करून विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करत वातावरण आनंदमय केले.प्रार्थनेच्या वेळी शासनाच्या वतीने कृषी विस्तार अधिकारी सौ. मनीषा डोंगरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सोनपापडी हे मिष्टान्न देण्यात आले.प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गांची आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.यावर्षी प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर हे सेवानिवृत्त होत असतानाही त्यांनी दाखवलेला उत्साह व विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता सर्वांच्या प्रशंसेचा विषय ठरली.या कार्यक्रमासाठी उपप्राचार्या सौ. व्ही. डी. काळबांडे, पर्यवेक्षक विजय सदावर्ते यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आनंदात व प्रेरणादायी वातावरणात झाली.

Post a Comment

أحدث أقدم