मलकापूर :- वाढदिवस म्हटल की केक, फुगे, बुके, बॅनर, फरसाण, पेढे,चॉकलेट फटाके इत्यादी वर होणारा खर्च होत असतो मित्रमंडळी मध्ये पार्टी होतात. या व्यतिरिक्त एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करायचा ठरवल ते मलकापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघ यांनी चिरंजीव आयुष शंकर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप यांच्याशी संपर्क साधून रक्तदान करण्याचा निर्णय घेतला व वाढदिवसानिमित्त खर्चे मॅडम यांच्या लॅब वर रक्तदान करून घेतले वाढदिवसानिमित्त रक्तदान करणे एक उत्तम आणि जीवनदान देणारी कृती आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक पर्याय आहेत पण रक्तदान केल्याने आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो आणि त्यामुळे आपला वाढदिवस अधिक अर्थपूर्ण होतो असे त्यांना समजले एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातूनच हे शक्य आहे यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. या महाकार्यात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा असे प्रतिपादन हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप यांनी केले.
मुलाच्या वाढदिवसाचे औचित साधत पित्याने केले रक्तदान...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق