Hanuman Sena News

हैदराबाद - भावनगर या विशेष गाडीचा थांबा जिल्हा प्रवासी सेवा संघातर्फे ३१मे ला उद्घाटन...




मलकापुर:- गाड़ी नं ०७०६१ - ०७०६२ हैदराबाद -भावनगर या विशेष गाड़ीचा थांबा उद्घाटन सोहळा जिल्हा प्रवासी सेवा संघ तर्फे दिनांक ३१ मे २०२५ वार शनिवार ला दुपारी ११.४५ वाजता खलील  मान्यवर उपस्थित होणार आहे.नुकताच रेल्वे प्रशासनाने लाम पल्ल्याच्या हैदराबाद भावनगर या गाडीचा थांबा मलकापूरला मंजूर केला आहे या गाडीचा थांबा उद्घाटन सोहळा मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते तसेच भुसावळ विभागाच्या विभाग व्यवस्थापक(DRM ) इति पांडे यांच्या विशेष उपस्थितीत तर भरतसेठ दंड, संतोष संचेती, सुहास चवरे,जीवनलाल झाबक ,दीपक गोपालराव पाटील, सागरमल कोचर, संदीप जाधव, नेहमीचंद वर्मा, ZRUCC  मेंबर अनिरुद्ध कुलकर्णी भुसावल  च्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर रेल्वे स्थानकावर होणार आहे.या आनंदी प्रसंगी हजर राहावे असे आव्हान जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. महेंद्रकुमार बुरड तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक माजी ZRUCC  सदस्य शेखर धरणगावकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post