मलकापूर :- वारकरी संप्रदाय संस्कृतीची येणाऱ्या पिढीला शिकवण देऊन वारकरी संप्रदायाची जोपासना व्हावी या उद्देशाने श्रीं संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रष्ट मलकापूर यांच्या सौजन्याने वारकरी बाल संस्कार निवासी शिबिर दि.१७ मे ते २३ मे पर्यंत लि.भो. चांडक विद्यालयात संपन्न झाले.शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद संस्कृत भाषा प्रमुख ह. भ. प. सौ. सविता घोडके यांनी केले. शिबिरात ह. भ. प .सुनील महाराज बावस्कर , ह .भ. प. प्रवीण महाराज आऴद , यांनी मृदंग ,टाळ, पावल्या शिकविल्या. ह.भ.प.प्रसाद महाराज घोडके यांनी योगा,खेळ,तर ह.भ.प. अभिराम महाराज घोडके यांनी श्लोक पठन करविले. शिबिरात मेघना सोनार,सौ. मनिषा राजगुरे, सौ. चेतना तिवने यांनी मोलाचे सहकार्य केले. उत्कृष्ट शिबिरार्थी धनंजय राजगुरे, प्रथम कु पूर्वा फरपट,द्वितीय कु. सान्वी यांनी स्थान मिळविले प्रत्येक शिबिरार्थ्यास सार्थ श्रीमद्भागवतद्गीता देण्यात आली. शिबिरात काकडा, श्लोक, योग, गीता अध्याय बारावा व पंधरावा , हरिपाठ,पाऊल्या, मृदग , टाळ,अभंग इ. विषय शिकविण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपात सौ. निताताई गाठणे, सोनार समाज अध्यक्षांच्या पत्नि सौ. अलका ताई, तसेच सौ. ललिता ताई सोनार यांची उपस्थिती व मार्गदर्शन मिळाले. शिबिर यशस्वी होण्याकरिता दामोदर लखानी, गजानन महाराज सेवा समिती,चांडक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी वृंद, वि.हि.प यांचे सहकार्याने लाभले.
वारकरी बाल संस्कार शिबिराची सांगता...
Hanuman Sena News
0
Post a Comment