Hanuman Sena News

गायींची तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे...

मुंबई: गोवंश हत्या प्रकरणी आणि गायींच्या तस्करीबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहेत. गोवंश हत्या करण्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. अशी मागणी विधानसभेत आमदार संग्राम जगताप यांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक मोठी घोषणा केली.मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार आमदार संग्राप जगताप यांनी गोवंश हत्या या घटना गंभीर असून, यावर शासनाने उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोवंश हत्या संदर्भात वारंवार ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कडक कारवाई केली जाईल. तसेच मकोका अंतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात येईल. गुन्हेगाराला सोडणार नाही" गायींच्या तस्करी देखील छुप्या पद्धतीनं केल्या जात आहेत. जर कोणताही आरोपी वारंवार गायींच्या तस्करीबाबत पकडला गेला तर, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. दरम्यान, राज्य सरकार गायींच्या तस्करीबाबत बारकाईनं लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात गुन्हे रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील. एखाद्या व्यक्तीचा गो-हत्येमध्ये वारंवार सहभाग आढळला तर, त्याच्याविरुद्ध मकोकासारखा कायदा वापरुन त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय

Post a Comment

أحدث أقدم