Hanuman Sena News

जो भारतभूमीला माता मानतो, तो हिंदू — परीक्षितजी जावडे..



मलकापूर :सामाजिक समरसता निर्माण होऊन हिंदू समाजाचे एकत्रीकरण व्हावे तसेच समाजाभिमुख विचार प्रस्थापित व्हावेत या उद्देशाने श्रीराम वस्ती, नवा मोहल्ला, छोटा गुरुद्वारा येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास प.पू. पंडित गोपालकृष्णजी पाराशर धुंधडकावाले, उज्जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ प्रांताचे सह-प्रचारक परीक्षितजी जावडे उपस्थित होते. महिला वक्त्या म्हणून कु. पायल राजपूत (सह-संयोजिका, दुर्गा वाहिनी, खामगाव जिल्हा) उपस्थित होत्या. कार्यक्रमाला मदनजी चोपडा (विश्वस्त, छोटा गुरुद्वारा) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात गौमाता पूजन तसेच गुरु नानकजिच्या आणि भारत माता यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत दुर्गा वाहिनीच्या मुलींनी ‘नारी शक्ती’ या विषयावर आधारित ‘द्रौपदी वस्त्रहरण’ या प्रसंगावरील नाटिका सादर केली.याप्रसंगी कु.पायल राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला सशक्तीकरण व आत्मनिर्भरतेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आजच्या स्त्रीला संधी दिल्यास आकाशालाही गवसणी घालण्याची ताकद तिच्यात आहे.पंडित गोपालकृष्णजी पाराशर महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हिंदू समाजाची एक कमजोरी अशी आहे की तो तत्त्वतः एकत्र दिसतो; परंतु निर्णायक क्षणी एकत्र राहात नाही. त्यामुळे अशा हिंदू संमेलनांची आवश्यकता आहे. गीता, गंगा आणि गाय यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रमुख वक्ते परीक्षितजी जावडे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘हिंदू’ची व्यापक व्याख्या स्पष्ट केली. ते म्हणाले, “हिंदू म्हणजे जो जाती-पातीच्या पलीकडे विचार करतो, भारतीय संस्कृतीचे पालन करतो, या भारतभूमीला माता मानतो आणि भारतातील सर्व धरोहर व थोर पुरुषांविषयी आदर बाळगतो, तो हिंदू होय.” ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्रातून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडते, असे त्यांनी नमूद केले. कोरोना काळात भारताने जगातील शंभरपेक्षा अधिक देशांना लस उपलब्ध करून देत ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजासाठी आवश्यक पंचसूत्री — सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशीचा स्वीकार तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये — यांचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.कार्यक्रमाची सांगता भारत माता आरती व अरदासने  झाली. या प्रसंगी सतीशजी सब्बलवार यांचे विशेष सहकार्य लाभले.या संमेलनास परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उत्कर्ष बक्षी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील बेलोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम उप्पल तसेच सुघोष ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post