प्रदीपजी जयस्वाल
शेलापुर:- बौद्ध धम्मानुसार भिक्षु -भिक्षूंनी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वर्षावास करत असतात, या वर्षी हे दुर्लभ पुण्य शेलापूर बु !येथील उपासक -उपसिकांना लाभले.पु.भन्ते महामहेंद्र जी (77), तोरणाळा हे दि. 10जुलै पासून बुद्धांकुर बुद्ध विहार, शेलापूर ला वर्षावास करत आहेत,गेल्या अडीच महिन्यापासून प्रति दिन 6 वाजता ध्यान, बुद्ध पूजा, 11वाजता उपासक त्यांना याचना करून आपल्या घरी भोजनदान आणि दान देतातं, रात्री 8 ला संध्याकाळ चे प्रवचन होते त्यात पु. भन्ते धर्म आणि आचरण यांचे मार्गदर्शन करतात,सोबतच बाबासाहेब लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पण वाचन सुरु असते.व्यवसाय निमित्त बाहेर गाव स्थायिक असलेले ग्रामस्थ पण गावात परत येऊन भोजनदान आणि पुण्य अर्जित करत आहेत. शेलापूर वासियांमध्ये उत्साहाचे वातारण असून याचा लाभ सर्व घेत आहेत,अडीच हजार वर्षापासूनची ही परंपरा आहे बुद्ध काळापासून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आदेशानुसार भिक्षु गण वर्षा वास करतात, 3 महिने, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत एका ठिकाणी निवास करतात, या काळात पु. भन्ते डी.धम्मसरण जी, बाळापूर, पु. भन्ते मैत्रयबोधी,सुरत, पु. भन्ते धम्मरत्न जी, चांदुरबिस्वा यांनी सुद्धा उपासकांवर अनुकंपा करून शेलापूर येथे भेटी दिल्या आणि धर्माचे मार्गदर्शन केले येत्या 7ऑक्टोबर अश्विन पौर्णिमेला वर्षावास समारोप होईल.
Post a Comment