Hanuman Sena News

मलकापूर चांडक विद्यालयाच्या क्रीडा विभागाचे दुहेरी यश!


खो-खो व बुद्धिबळ स्पर्धेत मुला-मुलींनी गाजवली जिल्हास्तरीय निवड

मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या क्रीडा विभागाने पुन्हा एकदा दुहेरी यशाची नोंद केली आहे. दि. 15 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये मुलींच्या खो-खो संघाने आणि मुलांच्या बुद्धिबळ संघाने अप्रतिम खेळ करत जिल्हास्तरावर निवड मिळवली आहे.आज स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत चांडक विद्यालयाच्या मुलींचा दबदबा पाहायला मिळाला.१७ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने उत्कृष्ट खेळ करीत विजेतेपद पटकावले.संघाच्या दमदार कामगिरीमुळे या संघाची थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन भर पडली आहे.आजच तालुका क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत देखील चांडक विद्यालयाने आपली छाप सोडली.स्पर्धेत यशोधम पब्लिक स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स, मधुभाऊ सावजी इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय, नूतन इंग्लिश स्कूल, गोविंद विष्णू महाजन विद्यालय व विद्या विकास वाकोडी विद्यालय या शाळांमधील एकूण ५० खेळाडू सहभागी झाले होते.या कठीण स्पर्धेत चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम रणनीती आणि खेळाचे प्रदर्शन करीत जिल्हास्तरीय निवड मिळवली.५वा क्रमांक – कृष्णा निंबाळकर,६वा क्रमांक – जुगनू वर्मा,७वा क्रमांक – केशव लांजुळकर,८वा क्रमांक – सार्थक वैद्य  या चौघांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.खो-खो व बुद्धिबळ या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे चांडक विद्यालयाच्या क्रीडा विभागाचे नाव पुन्हा उज्ज्वल झाले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे विद्यालयात आणि तालुक्यात कौतुक होत असून, या दुहेरी यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा निश्चितच दुणावणार आहे.संपूर्ण परिसरात चांडक विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील गौरव होत असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी  प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post