मलकापूर : यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमधील विशेष आकर्षण ठरला तो ‘नमो 75’ या स्वरूपात विद्यार्थ्यांनी तयार केलेला मानवी साखळी उपक्रम.सुमारे २५० विद्यार्थ्यांनी मैदानावर बसून “नमो 75” असा भव्य आकार दिला आणि एकमुखाने शुभेच्छा देत देशाच्या नेतृत्वाला अनोखी पद्धतीने शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग पाहून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.या सोबतच विद्यालयात इतरही उपक्रम राबविण्यात आले. कला शिक्षक श्री. येवलकर यांच्या कुशल हातातून शाळेच्या दर्शनिभागात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आकर्षक प्रतिमा रेखाटण्यात आली. तर इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुशलतेने पुष्पगुच्छ तयार करून पंतप्रधानांना शुभेच्छा अर्पण केल्या. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नवनिर्मितीची क्षमता आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले.या सर्व उपक्रमांचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपमुख्याध्यापक श्री. निंबोळे व पर्यवेक्षक श्री. संजयसिंह तोमर यांनी नियोजन केले. सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.‘नमो 75’ साखळी हा उपक्रम सर्वांच्या लक्षात राहील असा ठरला, अशी भावना पालक व मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अनोख्या शुभेच्छा...
Hanuman Sena News
0
Post a Comment