Hanuman Sena News

मलकापूर येथील ली.भॊ.चांडक विद्यालयात स्व. वसंतराव कसबेकर कक्षाचे नामकरण संपन्न...


मलकापूर : नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भॊ. चांडक विद्यालयात दि. 20 ऑगस्ट रोजी स्व. वसंतराव कसबेकर यांच्या स्मृती निमित्त विद्यालयातील एका कक्षाला स्व. वसंतराव कसबेकर कक्ष असे नामकरण करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाऊसाहेब डोरले तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा. तालुका संघचालक श्री ज्ञानदेवजी पाटील व समाजसेवक दिपकजी तायडे तसेच प्रमुख मार्गदशक म्हणून श्री रविजी भुसारी लाभले. दरम्यान विद्यालयातील कक्षाला प्रमुख अतिथी श्री दिपकजी तायडे यांच्या हस्ते 'स्व. वसंतराव कसबेकर कक्ष ' या नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात येऊन सुरवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते भारत माता व संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्व. वसंतराव कसबेकरांच्या प्रतिमेचे अनावरण संस्थेचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोरले यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित स्व. वसंतराव कसबेकर स्मृती समिती, विदर्भ प्रांत चे सक्रिय  सदस्य श्री सुरेशजी कुलकर्णी, श्री रामेश्वर फुंडकर, श्री विनोद देशमुख, श्री राम भिरड, श्री निशिकांत देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नगर सेवा समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक श्री रविजी भुसारी यांनी आपल्या प्रचारकीय जीवनात स्व. वसंतराव सोबत घालवलेल्या आठवणीना उजाळा दिला. ते म्हणाले स्व. वसंतराव हे खऱ्या अर्थाने संघ मंदिराच्या पायातील पत्थरा पैकी एक आहेत.ते अकोला विभाग प्रचारक असतांना या विभागात सर्वाधिक संघ शाखा होत्या. त्यांचे संघाचे कार्य हे अविरत  चालू असतांना विदर्भात सहकारी बँकाच तसेच शिक्षण संस्था उभारून विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हा जसा हेतू होता तसाच होतकरू संघ कार्यकर्त्याना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून देणे हा उदात्त उद्देश त्यांचा होता. आज त्यांनी लावलेल्या बिजातून असंख्य रोपटे हे विशालकाय वाटवृक्षमध्ये रूपांतरित झाले आहे. त्या पैकी नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालय सुद्धा एक आहे.त्यांच्याच प्रेरणेतून आपल्या भागात दि नांदुरा अर्बन, दि. खामगाव अर्बन, दि. अकोला अर्बन अशा अनेक बँक व शिक्षण संस्था स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत. त्यानी जीवनात फक्त कार्य केले पण कधीही कोणताही सत्कार स्विकाराला नाही.स्व. वसंतरावानी गडचिरोली जिल्ह्यात वासाला ह्या आदिवासी भागात सुद्धा त्यानी शाळा उभी केली. शाळेसाठी लागणारा निधी जमा करण्यासाठी त्यांनी मुंबईला गायनच्या व यांचे नृत्याच्या कार्यक्रमातून निधी मिळवून दिला.स्व. वसंतराव शेवटच्या क्षणा पर्यंत नागपूर कार्यालयात येणाऱ्या कर्यकर्त्यांना भेटत असत.त्यांच्या शेवटच्या क्षणी जेंव्हा मी तत्कालीन प्रांत प्रचारक असतांना त्यांना विदर्भातील संघ शिक्षवर्गातील स्वयंसेवकच्या वाढत्या संख्ये बाबत माहिती  दिली, त्या संघ वाढीचे समाधान आयुष्याच्या शेवटच्या क्षणी होते.त्यांच्या इच्छे नुसार  देहादानाने त्यांची केशवधामाची यात्रा संपली, त्याच्या जीवनकार्यातून संघकार्यकर्त्यांनी  प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.या प्रसंगी नगर सेवा समितीचे कार्यवाह तथा मा. नगरसंघचालक श्री दामोदरजी लखानी, कोषाध्यक्ष श्री सुगनचदजी भंसाली, ऍड. अभिजितजी एदलाबादकर व मा. नगर सहसंघचालक राजेशजी महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धर्मेद्र त्रिवेदी यांनी केले. ह्या वेळी धीरज वैष्णव यांनी वैयक्तिक गीत सादर केले. या कार्यक्रचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post