मलकापूर- भारतीय जनता पार्टीच्या मलकापूर शहरातील उपाध्यक्षपदी रवि मोहन वानखेडे यांची (सन २०२५ ते २०२८) कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या विचारधारेने प्रेरित होऊन आणि पक्ष संघटनासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.भाजपा प्रदेश काँग्रेस आ.चैनसुख संचेती आणि शहराध्यक्ष संतोष बोबटकार यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या पदावर काम करताना पक्षाची विचारधारा व विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, तसेच लोकसंपर्क वृद्धिंगत करण्याचे आवाहन करण्यात आले. नियुक्तीबद्दल रवि वानखेडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
रवी मोहन वानखेडे यांची भाजपा मलकापुर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती...
Hanuman Sena News
0
Post a Comment