मलकापूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय येथे दिनांक 16/08/2025 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. मुले श्रीकृष्ण आणि मुली राधाच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा नाटिका आणि नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे आपली संस्कृती, रूढी, परंपरा यांचा अनमोल ठेवा जपत आदर्श प्राथमिक विद्यालयात दहीहंडीचा उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा...
Hanuman Sena News
0
Post a Comment