मलकापूर :- दिनांक 23 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे संचालक श्री. संजयजी चांडक हे हजर होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, तसेच मोफत पाठ्यपुस्तके, तसेच वह्या देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नवगतांच्या हाताचे ठसे घेऊन त्यांच्या मंगलमय प्रवेशाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांची वाजत- गाजत गावामधून मिरवणूक काढण्यात आली. शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घेतलेल्या पालकांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीचे कार्टून डोरेमॉन, डोनाल्ड डक यांनी विद्यार्थ्यांसोबत धमाल अशी मस्ती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.....
Hanuman Sena News
0
Post a Comment