नांदुरा:- शहरात चोरी, चिडिमारी व इतर संतापजनक घटना घडत असल्याने या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या अध्यक्षतेत शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने पोलीस स्टेशन नांदुरा येथे सिसिटीव्ही बसविन्याचा विनंती अर्ज दिला होता. या अर्जाची दाखल घेत नांदूरा शहरामध्ये ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले; सदर माहिती शिवसेना संघटनेला पत्राद्वारे कळविण्यात सुद्धा आली होती.मात्र काही काळापासून हे सिसिटीव्ही शोभेची वस्तू बनल्याचे दिसत होते. त्यामुळे नांदुरा शहरात दुचाकी वाहणांच्या चोरीचे प्रमाण वाढले असून सिसिटीव्ही बंद असल्यामुळे या चोरीचा तपास लागणे कठीण झाले होते. यासोबतच अनेक भागातील पथदिवे बंद असल्याकारणाने रात्रीच्यावेळी व सकाळी सुर्योदयापुर्वी शिक्षणाकरीता तसेच शिकवणी वर्गांकरीता जाणाऱ्या विद्यार्थीनी, नोकरी करणाऱ्या महीला यांना अंधारातुन जातांना टवाळखोर, चिडीमार हयांचे पासुन त्रास होण्याची संभावना अधिकप्रमाणात वाढलेली असताना सदर पथदिव्यांच्या अडचणीबाबत विद्युत विभागात विनंती केली असूनसुद्धा त्यावर कारवाई झालेली नसल्यामुळे शिवसेना संघटनेसह सामान्य जनतेमध्ये संताप पसरलेला दिसून आला. परंतू शहरातील सि.सि.टी.व्ही. बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सदर विषय शिवसेना नांदुरा शहर अध्यक्ष अनिलभाऊ जांगळे यांच्या अध्यक्षतेत निवेदनाद्वारे मा. मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद नांदुरा यांना सुचित करण्यात आले होते. सदर निवेदनाची नगर परिषद, नांदुरा यांनी दखल घेतली असून बंद पडलेले पाथदिवे हे तातडीने सुरु करण्यात आले व नवीन भागामध्ये सुद्धा पाथदिवे लावण्यात आले. याबद्दल शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व संपूर्ण नांदुरा वासियांमधे दिलास्याची भावना पसरली आहे.
शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या मागण्यांना यश : पथ दिवे व सि.सि.टी.व्ही नव्याने सुरु...
Hanuman Sena News
0
Post a Comment