Hanuman Sena News

शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्षम शहरप्रमुख अनिल भाऊ जांगळे यांच्या नेतृत्वात 35 युवकांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश...


 नांदुरा:- महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या महाराष्ट्राला शिवरायांचा इतिहास लाभलेला आहे. मराठी माणसाठी महाराष्ट्र केवळ एक राज्य नसून एक जिवंत सिद्धपुरुष आहे , या मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना संघटनेची १९ जुन रोजी १९६६ साली मराठी माणसाच्या हृदयात अमरत्व प्राप्त केलेले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली. आणि जनतेच्या मनात 'मी मराठी' असल्याचा अभिमान रुजवला.'शिवसेना' ही एक राजकीय संघटना असली तरी हिंदुत्वसाठी,  मराठी माणसाच्या हितासाठी, हक्कासाठी, समाजासाठी कोणतेही राजकारण न करता ठामपणे उभा असणारी ही संघटना! 'जीव गेला तरी चालेल, पण जीव असणारी मराठी माणसाची अस्मिता हिला ठेच लागता कामा नये ' हे या संघटनेचे तत्व.शिवसेना संघटनेच्या स्थापनेला ५९ वर्ष पूर्ण झाले आहेत; तरीदेखील या संघटनेचे तत्व आजही तेच असून त्यांचा वारसा कायम जपत पुढील पिढीपर्यंत पोहचवल्या जात आहे. वंदनीयबाळासाहेबांचे विचार तत्व सत्यात उतरविण्यासाठी आपले जीवनपनाला लावणारे शिवसैनिक म्हणजे जनतेचे कैवारी आनंद दिघे साहेब व त्यांचे सहकारी शिवसैनिक. आदरणीय मा.मुख्यमंत्री जनतेसाठी अहोरात्र झटणारे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब* हे सुद्धा याच तत्वावर व विचारांवर जनतेसाठी हितासाठी कार्य करत असल्याचे आपल्याला दिसते,यांच्याच कार्याच्या तसेच तत्वांच्या पाऊलखुणा ज्यांच्या कार्यात दिसतात असे व्यक्तिमत्व म्हणजे नांदुरा येथे शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे, यांच्या अध्यक्षतेत शिवसेना संघटनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना संघटनेमधे नविन शिवसैनिकांचा प्रवेश घेण्यात आला.प्रवेश घेतलेल्या नवनिर्वांचित सदस्यांना शहर प्रमुख अनिल जांगळे यांनी शिवसेना संघटनेच्या इतिहासासोबतच संघटनेचे तत्व, कार्य, संघटनेची वाटचाल, व संघटनेबद्दल इतर माहिती दिली.सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी संघटनेच्या विचारांवर व तत्वांवर चालण्याचे आश्वासन देऊन संघटनेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.यावेळी हरीश काटले युवा शहर प्रमुख महादेव सपकाळ उपशहर प्रमुख यांच्या उपस्थिती मध्ये शंभू नालट शाखाप्रमुख सचिन पुंडे उपशाखाप्रमुख,संकेत गुजर,वैभव धुळे,दीपक भटकर,प्रशांत जाधव,मनोज चिम,गोलू कवळे,अक्षय ताकवले,प्रकाश बावस्कार शाखाप्रमुख प्रसाद नेमाडे,श्याम बडवे आकाश इंगळे,चेतन खडे,अतुल काळे शाखाप्रमुख,अंकुश काळे उपशाखाप्रमुख,आनंद सातव,निलेश काळे,विशाल पिसे,अंकुश इंगळे,राजेश ताकवले, शाखाप्रमुख,राधेश्याम कंठाळे उपशाखाप्रमुख, नितीन सुरळकर,विकास नागलकर,दत्ता सातव, प्रकाश सातव,रवी मात्रे शाखाप्रमुख शुभम इंगळे उपशाखाप्रमुख,अंकुश तायडे,विठ्ठल इंगळे,सुनील तायडे,संतोष कंकाल,शुभम ढवळे व इतर शिवसैनिकांनी शिवसेना या संघटनेमध्येमध्ये प्रवेश घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post